आवाजाची दुनिया

6. माहिती आहे??

Story: महेश दिवेकर, डिचोली |
18th September 2020, 11:10 pm
आवाजाची दुनिया

https://consequenceofsound.net/2014/10/nasa-releases-actual-recordings-from-space-and-theyre-absolutely-breathtaking/

---

https://www.youtube.com/watch?v=qPccFDWYoxs

अंतराळ हे रिकामी, पोकळ नाही. अजिबात शांतही नाही. पण, पृथ्वीवर अब्जावधी आवाज आम्हाला दिवसरात्र ऐकायला मिळतात, तसे अंतराळात मिळतात का? नाही. मात्र, तेथे आवाज आहेत. आम्हा मानवांना ते ऐकायला येत नाहीत. अमेरिकन अंतराळ संस्था नासा अंतराळातील आवाज टिपण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून करत आहे. अंतराळात सोडलेली विविध याने, उपग्रह, अंतराळ केंद्र वगैरेंतील यंत्रणा हे आवाज शोधत असते.

अंतराळात कितीतरी सूर्यमाला आहेत, असे म्हणतात. त्याविषयी अजून काही ठोस हाती लागलेले नाही. पण, तेथे मॅगनेटिक, इलेक्ट्रिक क्षेत्र आहे. अनेक लहरी उठतात. त्याला प्लाझ्मा वेव्हस म्हणतात. प्रत्येक ग्रह, चंद्र, आमची पृथ्वीही फिरताना आवाज करते. समुद्राच्या लाटा, वादळाचे आवाज येतात, तसे हे आवाज. ते सतत बदलतही असतात. महाप्रचंड सूर्यही कायम व्हायब्रेट होतो. तो व्हायब्रेशनचा आवाज तर ऐकण्यासारखा.

नासाने सूर्याच्या कंपनाचा आवाज, गुरू, शनी, युरेनस, मंगळ, धुमकेतू वगैरेंच्या इलेक्ट्रो- मॅगनेटिक लहरी टिपल्या आणि त्यांचे आवाजात रुपांतर केले. चला तर, वर दिलेल्या लिंकवर जाऊन हे आवाज ऐकूया. पण, तत्पूर्वी आपण अंतराळ केंद्रावर एकटेच बसलो आहोत, अशी कल्पना करा. डोळे मिटा व संगणक, फोनची व्हाॅल्यूम वाढवून इयरफोनच्या मदतीने हे आवाज ऐका. एका वेगळ्याच जगात गेल्याचा भास होईल. आवाजाच्या अद्भुत दुनियेत. घाबरू मात्र नका हं.

----------------------------------------

बोनस लिंक - सूर्याची माहिती

https://www.youtube.com/watch?v=2HoTK_Gqi2Q