
मडगाव: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सुट्ट्यांमुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव जंक्शन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. ०११२९/०११३० (मुंबई - मडगाव - मुंबई विशेष): लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव विशेष गाडी (क्र. ०११२९) २५ जानेवारी रोजी मुंबईहून पहाटे १:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:०० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११३० ही २५ जानेवारी रोजी मडगावहून दुपारी १४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०५ वाजता मुंबईला पोहोचेल. १८ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०१००४/०१००३ (मडगाव - मुंबई - मडगाव विशेष): मडगाव - लोकमान्य टिळक विशेष गाडी (क्र. ०१००४) २४ जानेवारी रोजी मडगावहून सायंकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:५० वाजता मुंबईला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१००३ ही २५ जानेवारी रोजी मुंबईहून सकाळी ७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगावला पोहोचेल. २० डब्यांची ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या ठिकाणी थांबेल.
प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.