शैलेश गाड यांची पोलिसांत तक्रार

पणजी : नुकत्याच पार पडलेल्या जांबावली (Zambaulim) गुलालोत्सवात ९.२० लाख रुपयांची सोनसाखळी (Gold Chain) चोरीला (Theft) गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पर्वरी येथील शैलेश गाड यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पर्वरी येथील शैलेश गाड यांनी केपे पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १० मार्च रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ या वेळेत जांबावलीतील गुलालोत्सवाला उपस्थित होतो. यावेळी अज्ञात व्यक्तीने गळ्यातील सुमारे ५१ ग्राम वजनाची लॉकेट असलेली सोनसाखळी पळविली. सोनसाखळीची एकूण किंमत सुमारे ९ लाख, २० हजार रुपये इतकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. केपे पोलिसांनी (Quepem Police Station ) अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश गावकर करीत आहे.