खनिज विषयक याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी

लीजांतील खनिज काढण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयात खाण कंपनीने मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September 2020, 09:34 pm
खनिज विषयक याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी
पणजी : लीजांतील खनिज काढण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयात खाण कंपनीने मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. 
 राज्यात १५ मार्च २०१८ रोजी पूर्वी लीजांतील काढलेल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी सरन्यायाधीशांनी ३० जानेवारी २०२० रोजी निर्देश जारी करून सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यात आणखीन वाढ करण्याची मागणी एका खाण कंपनीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याबाबत कंपनीने अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती के. ए. जोझफ या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने मुदत दिल्यामुळे हे प्रकरण त्याचा खंडपीठात घेण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे ही सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. 

हेही वाचा