दिल्लीत अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या; प्रियकराला अटक, तिघे अल्पवयीन ताब्यात

बिअर पाजून केले अत्याचार; नंतर चाकूने भोसकून शेतात फेकला मृतदेह : कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके; यव्य दिल्लीतील कुशक रोड परिसरात १६ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीचा १९ वर्षीय प्रियकर शिवमसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दिल्लीत अल्पवयीन  मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या; प्रियकराला अटक, तिघे अल्पवयीन ताब्यात

नवी दिल्ली : वायव्य दिल्लीतील कुशक रोड परिसरात १६ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीचा १९ वर्षीय प्रियकर शिवमसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, युवती गेल्या वर्षभरापासून शिवमच्या संपर्कात होती. घटनेच्या दिवशी ती शिवमसोबत गेली होती. त्यानंतर आरोपी तिला एका टेम्पोतून घेऊन गेला. प्रवासादरम्यान तिला जबरदस्तीने बिअर पाजण्यात आली. त्यानंतर शिवम आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

अत्याचारानंतर युवतीने पोलिसांना माहिती देण्याची धमकी दिली. त्यामुळे संशयितांनी तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली आणि मृतदेह कुशक रोड परिसरातील एका शेतात फेकून दिला. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले.

कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

१३ सप्टेंबर रोजी शेतात एक छिन्नविछिन्न आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचा बराचसा भाग खाल्ला होता. तसेच एक हात मृतदेहापासून काही अंतरावर पडलेला होता. मृतदेहाची अवस्था इतकी खराब होती की, तो पुरुषाचा आहे की महिलेचा, हेही सुरुवातीला स्पष्ट होत नव्हते. अखेरीस हातावरील टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली.

५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात घटनाकाळात परिसरातून एक टेम्पो जाताना दिसला. मात्र, अंधारामुळे टेम्पोची स्पष्ट ओळख पटत नव्हती. त्यानंतर १५ आणि १६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित टेम्पो शोधून काढला. चालकाची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील चारही संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, युवती यापूर्वीही घरातून निघून काही दिवसांनी परत आली होती. यावेळीही ती स्वतःहून घराबाहेर गेली असेल, असे कुटुंबीयांना वाटले. त्यामुळे तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार तातडीने करण्यात आली नव्हती.



हेही वाचा
सर्व पहा