५ हजार कोटींची संपत्ती, तरी आमदार का बनला भिकारी?

घाटकोपरच्या रस्त्यांवर एक दिवस मागीतली भिक; व्हिडीओ व्हायरल : घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार आणि पाच हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक पराग शहा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. शहा यांनी चक्क भिकाऱ्याचा वेश धारण करून आपल्या मतदारसंघातील रस्त्यांवर एक दिवस घालवला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, वेषांतर केल्यानंतर अनेकांना ते ओळखूही आले नाहीत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
५ हजार कोटींची संपत्ती, तरी आमदार का बनला भिकारी?

मुंबई : घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार आणि पाच हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक पराग शहा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. शहा यांनी चक्क भिकाऱ्याचा वेश धारण करून आपल्या मतदारसंघातील रस्त्यांवर एक दिवस घालवला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, वेषांतर केल्यानंतर अनेकांना ते ओळखूही आले नाहीत.

पराग शहा हे मुंबईतील प्रसिद्ध आणि संपन्न राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची संपत्ती पाच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्यावर फिरल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गुरूंच्या आज्ञेने घेतला अनुभव

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार शहा यांनी हा प्रयोग केला. त्यांनी साधे कपडे परिधान केले, आपला चेहरा आणि देखावा बदलला आणि घाटकोपर पूर्वमधील गर्दीच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेशात फिरले. या काळात त्यांनी सामान्य नागरिकांच्या नजरेतून आपलाच मतदारसंघ अनुभवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर भीक मागताना लोकांची वागणूक कशी असते, मदत करणारे किती जण असतात, काही जण दुर्लक्ष कसे करतात किंवा काही जण नकारात्मक प्रतिक्रिया कशी देतात, याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

सामान्य नागरिकांचे जीवन जवळून पाहण्याचा प्रयत्न 

हा प्रकार केवळ राजकीय स्टंट नसून, गुरूंच्या शिकवणुकीनुसार आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. एका दिवसासाठी का होईना, सामान्य नागरिकांच्या भूमिकेतून मतदारसंघातील परिस्थिती पाहण्याचा आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

भिकाऱ्याच्या वेशात असताना शहा यांना अनेक नागरिकांनी ओळखले नाही. काहींनी त्यांना मदत केली, तर काही जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. या संपूर्ण अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या आमदाराने एका दिवसासाठी भिकाऱ्याचे जीवन जगण्याचा घेतलेला हा अनुभव कितपत प्रभावी ठरला, याबाबत आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा