सहारनपूर : उत्तर प्रदेशातील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सहारनपूर येथील चलन साठवण केंद्रात (करन्सी चेस्ट) तब्बल १७.२९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याप्रकरणी तपासाला वेग आला आहे. केवळ ११ हजार मासिक पगार असलेला कंत्राटी कामगार या प्रकरणाच्या तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याच्या मालमत्तेची आणि आर्थकि व्यवहारांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्यामाहितीनुसार, संबंधित कामगार चलन साठवण केंद्रात (करन्सी चेस्टमध्ये) चालक कम लोडर म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याच्याकडे कथितपणे पाच घरे, एक एसयूव्ही, एक सेडान आणि दोन दुचाकी असल्याचे समोर आले आहे. या मालमत्ता कधी खरेदी करण्यात आल्या, त्या कोणाच्या नावावर आहेत आणि त्यासाठी पैशांचा स्त्रोत काय होता, याचा तपास सुरू आहे.
या मालमत्तांचा बनावट नोटांशी थेट संबंध असल्याचे अद्याप तपास यंत्रणांनी निश्चित केलेले नाही. मात्र, निलंबित करण्यात आलेले करन्सी चेस्ट व्यवस्थापक अमित कुमार यांच्याशी या कामगाराची कथित जवळीक असल्याने त्याच्या भूमिकेची सखोल चौकशी केली जात आहे.
वाहन चालकाचे काम; मात्र व्यवस्थापकाचा ‘सहाय्यक’?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कामगाराची अधिकृत जबाबदारी वाहन चालवणे आणि रोख रक्कम लोड करणे एवढीच होती. मात्र, तो करन्सी चेस्टमध्ये बराच वेळ उपस्थित राहत असे आणि प्रत्यक्षात व्यवस्थापकाच्या वैयक्तिक सहाय्यकाप्रमाणे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.११ हजार पगार, तरी दुसऱ्या चालकाला रोज ५०० रुपये!
त्याला करन्सी चेस्टमधील रोख हाताळणीच्या भागात प्रवेश होता का, त्याचे प्रत्यक्ष काम काय होते आणि त्याला रोकड हाताळण्याची संधी मिळत होती का, याची पडताळणी केली जात आहे.
तपासाचा मुख्य केंद्रबिंदू सध्या १७.२९ कोटींच्या बनावट नोटा पीएनबीच्या अस्सल चलनासाठी असलेल्या करन्सी चेस्टमध्ये कशा पोहोचल्या, हा आहे. अस्सल नोटांच्या जागी बनावट नोटांची अदलाबदल करण्यात आली होती का आणि खरी रक्कम कुठे गेली, याचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणामागे मोठे नेटवर्क असून, त्याला परदेशी कनेक्शन आहे का, याचाही तपास केला जात आहे. करन्सी चेस्टमधील रोख रकमेची हालचाल,
या कामगाराच्या जीवनशैलीनेही तपास यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. सुमारे ११ हजार रुपये मासिक उत्पन्न असतानाही तो स्वत: वाहन चालवण्याऐवजी कथितपणे दररोज सुमारे ५०० रुपये देऊन दुसऱ्या चालकाची नियुक्ती करत होता. त्यामुळे त्याचे उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यातील तफावत तपासली जात आहे.
पोलिसांनी बुधवारी मानकमऊ येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकला. यावेळी मिळालेली कागदपत्रे आणि इतर साहित्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मालमत्तेची कागदपत्रे, बँक खाती, वाहनांची नोंदणी तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.
बनावट नोटा करन्सी चेस्टमध्ये पोहोचल्या कशा?
बँकिंग व्यवहार आणि इतर आर्थिक नोंदी तपासून बनावट नोटा चलन व्यवस्थेत कशा दाखल झाल्या आणि त्यातील काही नोटा बाजारात पोहोचल्या का, याचा शोध घेतला जात आहे.


