केरी, पेडणेतील श्री देव आजोबा देवस्थानच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

कुलूप तोडून सुमारे ४० हजारांची रोकड लंपास, मांद्रे पोलिसांकडून तपास सुरू; केरी-तळवाडा येथील श्री देव आजोबा देवस्थानातील दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनू सुमारे ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
केरी, पेडणेतील श्री देव आजोबा देवस्थानच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

पेडणे : केरी-तळवाडा येथील श्री देव आजोबा देवस्थानातील दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनू सुमारे ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी श्रीकांत रामकृष्ण टाळकर यांनी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजण्यापूर्वी ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरट्यांनी देवस्थानच्या खुल्या आवारात ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मांद्रे पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली हरमलकर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा