म्हापसा येथे २ लाखांचा गांजा जप्त

झारखंडमधील युवकाला अटक; येथील नव्या कदंब बस स्थानकावर म्हापसा पोलिसांनी छापा टाकून सुमारे २ लाख रुपये किमतीचा २ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल कुमार मांझी (२२, रा. पलामू, झारखंड) याला अटक केली आहे. ‘नशा मुक्त भारत अभियान’अंतर्गत पोलिसांनी ही ड्रग्ज विरोधी कारवाई केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
म्हापसा येथे  २ लाखांचा गांजा जप्त

म्हापसा : येथील नव्या कदंब बस स्थानकावर म्हापसा पोलिसांनी छापा टाकून सुमारे २ लाख रुपये किमतीचा २ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल कुमार मांझी (२२, रा. पलामू, झारखंड) याला अटक केली आहे. ‘नशा मुक्त भारत अभियान’अंतर्गत पोलिसांनी ही ड्रग्ज विरोधी कारवाई केली.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ ते १०.४५ च्या सुमारास हा छापा टाकला. झडती वेळी संशयित आरोपी विशाल कुमार मांझी याच्याजवळ २ किलो गांजा सापडला. या ड्रग्जची २ लाख रुपये किंमत आहे.

या प्रकरणी  पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, विराज कोरगावकर, मंगेश पाळणी, हवालदार सुशांत चोपडेकर, शिवाजी शेटकर व सहकारी पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा
सर्व पहा