‘गोवा फर्स्ट’ नव्हे, तर ‘गोवा लास्ट’ निवडणूक ठरेल

गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात झालेल्या युतीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जोरदार टीका केली. ही युती ‘गोवा फर्स्ट’ नसून संबंधित दोन्ही पक्षांसाठी ‘गोवा लास्ट’ ठरणार आहे. गोव्यातील त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. या युतीला गोमंतकीयांचा पाठिंबा नाही. २०१७ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी जनता विसरलेली नाही, असा दावा चोडणकर यांनी केला.

15th September, 11:33 pm
‘गोवा फर्स्ट’ नव्हे, तर ‘गोवा लास्ट’ निवडणूक ठरेल

गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात झालेल्या युतीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जोरदार टीका केली. ही युती ‘गोवा फर्स्ट’ नसून संबंधित दोन्ही पक्षांसाठी ‘गोवा लास्ट’ ठरणार आहे. गोव्यातील त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. या युतीला गोमंतकीयांचा पाठिंबा नाही. २०१७ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी जनता विसरलेली नाही, असा दावा चोडणकर यांनी केला.
चोडणकर पुढे म्हणाले की, या निवडणुकीत गोवा फॉरवर्डसोबत काँग्रेसची युती नसल्याने फातोर्डा मतदारसंघात पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेल. विजय सरदेसाई यांचा पराभव करण्यासाठी नव्हे, तर फातोर्ड्यात विजय मिळविण्यासाठीच काँग्रेस मैदानात उतरणार आहे. दामू नाईक विजयी झाल्यास ते थेट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दामू नाईक यांना फातोर्ड्यातून उमेदवारी मिळू देणार नाहीत, असा दावा चोडणकर यांनी केला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर आक्रमकपणे टीका करणारे सरदेसाई आता अचानक मवाळ झाल्याचे दिसत असून, त्यांची आक्रमकता कमी झाली आहे.
दरम्यान, भविष्यात गोवा फॉरवर्ड पक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षाला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबतचा निर्णय काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांच्या समन्वय समितीमार्फत संयुक्तपणे घेतला जाईल. युतीबाबतचा निर्णय प्रथम स्थानिक पातळीवरील काँग्रेस व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष समन्वय समिती घेईल आणि त्यानंतर संबंधित पक्षश्रेष्ठींना त्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे युतीसंदर्भातील निर्णयाचे अधिकार स्थानिक समन्वय समितीकडेच आहेत, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.      

हेही वाचा
सर्व पहा