दाबोळी विमानतळावर १३५ कोटींचा नफा : संचालक ले. आकाश दीप

दाबोळी विमानतळाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करण्याची गरज नाही. विमानतळ सध्या सुमारे १३५ कोटी रुपयांचा नफा कमावत आहे. दररोज जवळपास ८५ विमानांची येन्‍जा होते. या माध्यमातून नियमित सुमारे १३ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती गोव्यातील दाबोळी विमानतळाचे संचालक लेफ्टनंट आकाश दीप यांनी दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दाबोळी विमानतळावर १३५ कोटींचा नफा : संचालक ले. आकाश दीप

वास्को : दाबोळी विमानतळाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करण्याची गरज नाही. विमानतळ सध्या सुमारे १३५ कोटी रुपयांचा नफा कमावत आहे. दररोज जवळपास ८५ विमानांची येन्‍जा होते. या माध्यमातून नियमित सुमारे १३ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती गोव्यातील दाबोळी विमानतळाचे संचालक लेफ्टनंट आकाश दीप यांनी दिली. 

दाबोळी विमानतळावर ‘यात्री सेवा अभियान’ सुरू करण्यात आले. त्यानिम‌‌ित्ताने त्यांनी वरील माहिती दिली. आगामी हिवाळी हंगामात एअरफ्लोटच्या आणखी १० विमान सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, फ्लाय९१ या विमान कंपनीच्या ऑपरेटरला दाबोळी विमानतळावर कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही विमान कंपनी कोणत्याही वेळी आपली सेवा सुरू करू शकते, असेही आकाश दीप यांनी स्पष्ट केले. दाबोळी विमानतळावरील प्रवासी वाहतूक आणि विमानांच्या हालचाली लक्षात घेता विमानतळाची कार्यक्षमता कायम असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा
सर्व पहा