२०२७ पर्यंत राज्यातील २१,२०० घरांवर सोलर रूफटॉप

मुख्यमंत्री : ६५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
२०२७ पर्यंत राज्यातील २१,२०० घरांवर सोलर रूफटॉप

गोवा सरकार आणि जीआयझेड यांच्यात सामंजस्य करार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.

पणजी : २०२७ पर्यंत राज्यातील २१,२०० घरांवर सोलर रूफटॉप बसवून ६५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यातील ५० टक्के घरांवर सोलर रूफटॉप बसविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी येथे हरित ऊर्जेवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य सरकार आणि जीआयझेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या पंचायती, ग्रीन कुकिंग आणि ई-बोट प्रकल्प सुरू करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.जुने गोवा येथील आयसीएआर परिसरात शेतीच्या माध्यमातून सौरऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच कॅनल टॉप सोलर, फ्लोटिंग सोलर आणि फोटोव्होल्टिक प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्ताव आहेत.
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत आतापर्यंत ३,१०० गोमंतकीयांनी नोंदणी केली असून, २८९ घरांवर सोलर रूफटॉप बसविण्यात आले आहेत. यासाठी ४.२८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.      

हेही वाचा
सर्व पहा