साखर-गूळ उतरले; तेल-फुलांचे दर मात्र वाढले

चतुर्थीच्या तोंडावर काही वस्तूंची दरवाढ : कडधान्य, मासळीचा दर स्थिर

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
साखर-गूळ उतरले; तेल-फुलांचे दर मात्र वाढले

म्हापसा : येथील बाजारपेठेत चालू आठवड्यात साखर व गुळाचा दर १० रुपये घसरला आहे. साखर ५५ रुपये तर गुळाचा दर ७० रुपये किलो झाला आहे. चतुर्थीचा सण तोंडावर असल्यामुळे फुलांसह तेलाचाही भाव वाढला असून भाजीपाला, मसाला, कडधान्य व मासळीचा दर मात्र मागील आठवड्याप्रमाणेच स्थिर आहे.

भाजीपाल्याचा किलो मागे किरकोळ दर : टॉमेटो ४० रुपये, बटाटे ४० रुपये, कांदा ६० रुपये, गाजर ८० रुपये, वांगी ५० रुपये, ढब्बू मिरची ५० रुपये, कोबी ३० रुपये, कॉली फ्लॉवर ३० रुपये, दुधी ३० रुपये, काबूल (चिटकी) ५० रुपये, मिरची ८० रुपये, आले १२० रुपये, लसूण २२० रुपये, भेंडी ६० रुपये, लिंबू ५ रुपये नग, पालक १५ रुपये जुडी, तांबडी भाजी १५ रुपये जुडी, कोथिंबीर २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये जुडी, कांदा पात १० रुपये जुडी, मेथी १५ रुपये जुडी, मका ५० रुपयांना तीन नग, कारले ४० रुपये, दोडके ६० रुपये, बीट ८० रुपये, वालपापडी १२० रुपये, वाल ८० रुपये, काकडी ३० रुपये, नारळ ३० ते ५० रुपये नग, मशरुम ५० रूपये, बेबीकॉर्न ५० रुपये, नीरफणस २५० ते ४०० रुपये.

तूरडाळ १४० ते १६० रुपये, चवळी १४० रुपये, मूग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, काबूल १४० रुपये, सोनामसूरी तांदूळ ६० रुपये, बासमती तांदूळ ६० ते १२० रुपये, गहू ४० रुपये, नाचणे ५० रुपये, साखर ५५ रुपये, गूळ ७० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ५० रुपये असा दर आहे.

फळांमध्ये सफरचंद २०० रुपये किलो, संत्रे २०० रुपये किलो, मोसंबी २०० रुपये किलो, पपई ६० रुपये किलो, पेरू २०० रुपये किलो, चिबूड १०० रुपये, चिकन २२० रुपये किलो, मटण १००० रुपये किलो व अंडी ९० रुपये डझन. फुलांमध्ये झेंडू १०० रुपये किलो, शेवंती १४० रुपये किलो, गुलाब १४० रुपये किलो.

देशी गावठी मिरची ६०० रुपये, काश्मिरी ९०० रुपये, गुंटूर मिरची ३६० रुपये, बेडगी ६०० रुपये, कोथिंबीर २८० रुपये, खसखस २००० रुपये, मिरे १२०० रुपये, हळद ३४० रुपये, बडीशेप ४०० रुपये, लवंग १४०० रुपये, वेलची ६००० रुपये, मिरची पावडर ६०० रुपये, हळद पावडर ४०० रुपये, पामतेल २२० रुपये लिटर, खोबरेल तेल ३०० रुपये लिटर.


हेही वाचा
सर्व पहा