पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा प्रश्न मार्गी

आमदार आर्लेकरांच्या मध्यस्थीनंतर उद्यापासून कामावर घेण्याचे आश्वासन; पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘लेक्चर बेसिस’वर कार्यरत असलेल्या पाच शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या मध्यस्थीनंतर या शिक्षकांना उद्यापासून कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
04th September, 02:43 pm
पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा प्रश्न मार्गी

पेडणे :  पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘लेक्चर बेसिस’वर कार्यरत असलेल्या पाच शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या मध्यस्थीनंतर या शिक्षकांना उद्यापासून कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

या आंदोलनामागे विरोधकांकडून विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संबंधित पाच शिक्षकांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली.  कमी करण्यात आलेल्या पाच शिक्षकांना उद्यापासून पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे आमदार आर्लेकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे तालुक्यात काही विरोधकांकडून “घाणेरडे राजकारण” केले जात असल्याची टीका केली. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात राजकारण करू नये आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा
सर्व पहा