शेल्डे, केपे येथे घरफोडी; १.९० लाखांचा मुद्देमाल लंपास

सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळाचा समावेश; चाडेगाळ-शेल्डे, केपे येथील एका घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक मनगटी घड्याळ मिळून सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
शेल्डे, केपे  येथे घरफोडी; १.९० लाखांचा मुद्देमाल लंपास

पणजी : चाडेगाळ-शेल्डे, केपे येथील एका घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक मनगटी घड्याळ मिळून सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

केपे पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक मनगटी घड्याळ घेऊन पसार झाला.

याप्रकरणी स‌िम्रन  गावस यांनी केपे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २.१० या वेळेत ही चोरी झाल्याचे  नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी केपे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा क्नोंद करण्यात आला आहे.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमेश प्रभुदेसाई करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नरत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा