कासारवर्णेतील जलवाहिनी वारंवार फुटतेय; जलपुरवठ्यात अडथळा

कायमस्वरुपी तोडगा काढण्याची पंच सदस्य वृशाली नाईक यांची मागणी; पेडणे तालुक्यातील कासारवर्णे पंचायत क्षेत्रात पाण्याची जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने पंच सदस्य वृशाली नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
कासारवर्णेतील जलवाहिनी वारंवार फुटतेय; जलपुरवठ्यात अडथळा

पेडणे : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) कासारवर्णे पंचायत क्षेत्रात पाण्याची जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने पंच सदस्य वृशाली नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जलवाहिनी फुटत असल्याने जलपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थान‌िकांनी केली आहे.

कासारवर्णे परिसरात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे जलपुरवठ्यावर परिणाम होण्याबरोबरच पाणी वाया जाते. तसेच दुुरुस्तीसाठीही खर्च करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलवाहिनी बदलावी अशी मागणी स्थानिक पंच सदस्य वृशाली नाईक व स्थानिकांनी केली आहे.

पंच सदस्य वृशाली नाईक यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत वारंवार फुटणारी जलवाहिनी व त्यामुळे होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. संबंधित यंत्रणेने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन जलवाहिनीचे नुकसान होण्यामागील कारणांचा शोध घ्यावा आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा