कोरगाव : शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या योजनांची माहिती, अर्ज आणि मार्गदर्शन स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मांद्रे पंचायत परिसरात सुरू करण्यात आलेल्या उपविभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयाचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणावी आणि मतदारसंघात हरितक्रांती घडवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर, मांद्रेचे सरपंच किरण सावंत, पंच राजेश मांद्रेकर, पंच सौ. हडफडकर, पंच रोझा फर्नांडिस, हरमलच्या सरपंच सौ. गडेकर, कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई, पेडणे विभागाचे कृषी अधिकारी रुद्रेश कांबळी आदी उपस्थित होते.


