पणजी बाजारात लिंबू १२ रुपयांना एक

आवक घटल्याने दरात वाढ : कांदा ७० रुपये किलो

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
19th October, 11:56 pm
पणजी बाजारात लिंबू १२ रुपयांना एक

पणजी : मागील काही आठवडे राज्यात भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. आवक कमी झाल्याने पणजी बाजारात लिंबूचे दर वाढले आहेत. सोमवारी पणजी बाजारात मोठा लिंबू १२ रुपये नग या दरात विकला जात होता. मध्यम आकाराचा लिंबू १० रुपये तर लहान लिंबू ७ रुपये नग होता. कांदा अद्याप ७० रुपये किलो आहे. लसूण आकारानुसार ४०० ते ५०० रुपये किलो झाला आहे. भेंडीचे दर कमी होऊन ८० रुपये किलो झाले आहेत. पुढील काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
पणजी बाजारात मिरचीचे दर वाढून १०० रुपये किलो झाले आहेत. नारळ आकारानुसार २५ ते ६० रुपये नग आहे. वालपापडीचे दर दर्जानुसार १०० ते १२० रूपये आहेत. फ्लॉवर ५० रु. तर कोबी ४० रुपयेला आहे. ढब्बू मिरची १०० रुपये किलो दराने विकली जात होती. टोमॅटो ४० रुपये तर बटाटा ५० रुपये किलो आहेत. बाजारात गवार ८० रुपये किलो आहे. तर मटार १६० रुपये किलो आहेत.
बाजारात लहान वांगी ६० तर मोठी वांगी ८० रुपये किलो आहेत. गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रु. किलो आहेत. दुधी भोपळा ५० रुपयाला नग आहे. दोडका १०० रुपये किलो आहे. मेथी ३० रू. तर शेपू २५ रुपये जुडी आहेत. पालक, जुडी २० रुपये आहेत. कोथिंबिरीचे दर २५ रुपये जुडी आहे. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ४८ रुपये, कोबी २३ रुपये, गाजर ४९ रुपये, वालपापडी ६६ रुपये, मिरची ६४ रुपये, कांदा ५७ रुपये, बटाटा २८ रुपये तर टोमॅटो २६ रुपये किलो आहेत.            

हेही वाचा
सर्व पहा