जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा

२०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत लैंग‌िक छळ; वेर्णा पोलीस स्थानक हद्दीत एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कामरुद्दीन ऊर्फ मोहम्मद धुनिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा

पणजी : वेर्णा पोलीस (Verna Police) स्थानक हद्दीत  एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन  वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कामरुद्दीन ऊर्फ मोहम्मद धुनिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित बिर्ला क्रॉसजवळ वास्तव्यास आहे.

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत संशयिताने मुलीशी गैरवर्तन करून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात कोणालाही सांगितल्यास जीवे मारून जंगलात फेकून देण्याची धमकी संशयिताने दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी वेर्णा पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहितेतील कलम ६५(२), ७४, ७५(२), ७६ आणि ३५१(३), गोवा बाल कायद्यातील कलम ८(२), तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास वेर्णा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा