दिवसाला ५ हून अधिक गोमंतकीयांनी सोडले भारतीय नागरिकत्व

विधानसभा अधिवेशनातील माहिती; मागील काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२६ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत गोव्यातील ६,९६० जणांनी त्यांचा पासपोर्ट ‘सरेंडर’ करून भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी १,९८९, महिन्याला सरासरी १६५ तर दिवसाला सरासरी ५ हून अधिक गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
01st September, 11:57 am
दिवसाला ५ हून अधिक गोमंतकीयांनी सोडले भारतीय नागरिकत्व

पणजी: मागील काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२६ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत गोव्यातील ६,९६० जणांनी त्यांचा पासपोर्ट ‘सरेंडर’ करून भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी १,९८९, महिन्याला सरासरी १६५ तर दिवसाला सरासरी ५ हून अधिक गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. विधानसभेत आमदार एल्टन डिकोस्टा यांनी याबाबत अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. 

या प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. उत्तरानुसार केंद्रीय संस्था एफआरपीओच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये गोव्यातील २,०९४ व्यक्तींनी पासपोर्ट सरेंडर केला होता. २०२४ मध्ये ही संख्या वाढून २,२९५ इतकी झाली. असे असले तरी २०२५ मध्ये पासपोर्ट सोडणाऱ्या गोमंतकीय व्यक्तींची संख्या कमी होऊन १,७९७ इतकी झाली. तर १ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान ७७४ जणांनी आपला पासपोर्ट सरेंडर केला आहे. पासपोर्ट सरेंडर केलेल्या व्यक्ती कोणत्या मतदारसंघातील आणि तालुक्यातील होत्या याची माहिती एफआरपीओकडे उपलब्ध नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.

हेही वाचा
सर्व पहा