‘कदंब’कडून २३ पदांसाठी नोकरभरती

अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
29th August, 11:31 pm
‘कदंब’कडून २३ पदांसाठी नोकरभरती

पणजी : कदंब वाहतूक महामंडळाने विविध २३ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ज्या पदांसाठी अर्ज केले आहेत, त्या पदांच्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची पात्रतेनुसार निवड करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये ४ सहाय्यक ट्रॅफिक इन्स्पेक्टर, १० ट्रॅफिक कंट्रोलर, १ सहाय्यक स्टोअरकीपर, ३ सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर, ४ शिपाई (एमटीएस) आणि १ सर्वेक्षक पदाचा समावेश आहे.

अर्जाचा नमुना महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत (दुपारची सुट्टी १ ते २) उपलब्ध होणार आहे. अर्जासाठी अनारक्षित वर्गातील उमेदवारांना १०० रुपये, तर राखीव वर्गातील उमेदवारांना ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

आवश्यक तपशील व कागदपत्रे जोडून, अर्जावर दिलेल्या जागी स्वतः प्रमाणित केलेला अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा. तसेच अर्जाच्या खाली स्वाक्षरी करून पूर्ण भरलेला अर्ज कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेड, मुख्य कार्यालय, पारासियो दी गोवा, आल्त पर्वरी येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावा.

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६ आहे. निर्धारित तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज नाकारण्यात येतील, अशी सूचना महामंडळाने दिली आहे.

हेही वाचा
सर्व पहा