दुप्पट परताव्याचे आमिष: फोंडा येथील महिलेची २२ लाखांची फसवणूक

महाराष्ट्रातील दोघांविरोधात गुन्हा; आर्थिक योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फोंडा येथील एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणुकीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समजून येताच महिलेने फोंडा पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार केली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
37 mins ago
दुप्पट परताव्याचे आमिष: फोंडा येथील महिलेची २२ लाखांची फसवणूक

फोंडा : आर्थिक योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फोंडा येथील एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणुकीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समजून येताच महिलेने फोंडा पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट पूर्वी आरोपी पाटील आणि दुर्गामाता (दोघांचीही पूर्ण नावे व पत्ते अद्याप स्पष्ट नाहीत), रा. महाराष्ट्र, यांनी तक्रारदार रुपाली नाईक यांच्याशी संपर्क साधला. आर्थिक योजनेत पैशांची गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे सांगून त्यांना दुप्पट परताव्याचे आमिष दाखवले. त्याचबरोबर मोठी रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने सविस्तर माहिती घेऊन पैसे दुप्पट होणार या आमिषाने २२ लाख रुपये गुंतवले. 

आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने एकूण २२ लाख रुपये गुंतवणुकीसाठी त्यांना पाठवले. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर आरोपींनी ती सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक केली नाही. तसेच आश्वासन दिलेला परतावा किंवा लाभही दिला नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने फोंडा पोलीस स्थानक गाठले. आणि रितसर तक्रार नोंदवली.

मात्र, गुंतवणूक करण्यास सांगितलेल्या पाटील आणि दुर्गामाता या दोघांचेही पू्र्ण नाव, पत्ता आणि सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडथळा ‌‌निर्माण होत आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक देविशा नाईक अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा