सप्टेंबरमध्ये १२ दिवस असणार बँका बंद! सुटट्यांची यादी जाणून घ्या

सण, शनिवार-रविवारसह बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असल्यास ती वेळेत पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध सण, साप्ताहिक सुट्ट्या तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे सप्टेंबरमध्ये देशभरातील बँकांच्या शाखा एकूण १२ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
सप्टेंबरमध्ये १२ दिवस असणार बँका बंद! सुटट्यांची यादी जाणून घ्या

मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असल्यास ती वेळेत पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध सण, साप्ताहिक सुट्ट्या तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे सप्टेंबरमध्ये देशभरातील बँकांच्या शाखा एकूण १२ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) सप्टेंबरमध्ये चार दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यानुसार ११ सप्टेंबरला एक दिवसाचा, तर २८, २९ आणि ३० सप्टेंबरला सलग तीन दिवसांचा संप होणार आहे.

कामकाजाच्या पाच दिवसांच्या आठवड्यासाठी संप 

बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा, तसेच सर्व बँकांमध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) करार समान पद्धतीने लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

सणांमुळेही बँका बंद

सप्टेंबरमध्ये विविध सणांमुळे काही राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, तर १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि हरतालिका यानिमित्त संबंधित राज्यांमध्ये बँक शाखा बंद राहतील. याशिवाय ६, १२, १३, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांचे नियमित कामकाज बंद राहणार आहे.

डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार

बँक शाखा बंद असल्या तरी एटीएम (ATM),  यूपीआय (UPI), इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा सामान्यपणे सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेक जमा करणे आणि बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावयाची कामे असल्यास ग्राहकांनी सुट्ट्यांचे नियोजन करून ती कामे आधीच पूर्ण करणे सोयीस्कर ठरणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा