न्हयबाग-पोरस्कडे जंक्शनवरील उड्डाणपूल बांधकामाजवळ बसचा अपघात; प्रवासी सुखरूप

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
22 mins ago
न्हयबाग-पोरस्कडे जंक्शनवरील उड्डाणपूल बांधकामाजवळ बसचा अपघात; प्रवासी सुखरूप

पणजी: मुंबईहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसचा न्हयबाग-पोरस्कडे जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या निर्माणाधीन क्षेत्रात शिरून अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.



न्हयबाग-पोरस्कडे जंक्शनवर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुलासाठी खांबांचे खोल खोदकाम करण्यात आले आहे. मुंबईहून येणाऱ्या या बसच्या चालकाचा अंदाज चुकल्याने ती रस्ता ओलांडून थेट बांधकाम क्षेत्रात शिरली. बस खड्ड्याच्या कडेला अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेनंतर बांधकाम क्षेत्राभोवती पुरेसे बॅरिकेड्स, प्रकाशयोजना आणि स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने चोख सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा