कोलवा पोलीस स्थानकात प्रशासकीय फेरबदल; निरीक्षक विदेश शिरोडकर यांची राखीव दलात बदली

कोलवा पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांची दक्षिण गोवा जिल्हा राखीव दलात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राघोबा कामत यांच्याकडे कोलवा स्थानकाचा प्रभार सोपवण्यात आला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
कोलवा पोलीस स्थानकात प्रशासकीय फेरबदल; निरीक्षक विदेश शिरोडकर यांची राखीव दलात बदली

मडगाव: दक्षिण गोवा पोलीस दलात महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून कोलवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विदेश शिरोडकर यांची मडगाव मुख्यालयातील दक्षिण जिल्हा पोलीस राखीव दलात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक यांनी जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्याकडे चालू वर्षाच्या मे महिन्यात कोलवा पोलीस ठाण्याचा कारभार सोपवण्यात आला होता. अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची ही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कुळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांची कोलवा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राघोबा कामत हे यापूर्वी दक्षिण जिल्हा पोलीस राखीव दलात कार्यरत होते.

पोलीस अधीक्षकांनी जारी केलेल्या आदेशानुसार, राघोबा कामत यांनी कोलवा पोलीस ठाण्याचा प्रभार तत्काळ स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी विनाविलंब रुजू व्हावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या तडकाफडकी करण्यात आलेल्या बदलीमागील अधिकृत प्रशासकीय कारण स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा
सर्व पहा