लखनऊ :उत्तर प्रदेशात मान्सूनीपावसामुळे नद्यांना आलेल्याउधाणाने पुराचा धोका वाढलाआहे. राज्यातील १३जिल्ह्यांमधील १७३ गावेपुराच्या तडाख्यात आलीआहेत. तब्बल ८४,३६२नागरिक आणि १३,०५८हेक्टर क्षेत्र प्रभावितझाले आहे.
परिस्थिती नियंत्रणातअसल्याचे राज्याचे मदत आयुक्तऋषिकेश भास्कर यशोदा यांनीसांगितले. जिल्हाप्रशासनाला ‘हाय अलर्ट’वरठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तभागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासोबतच भोजन,आरोग्य सुविधा आणिइतर आवश्यक मदत पुरविण्याचेकाम युद्धपातळीवर सुरू आहे.
१३ जिल्ह्यांतील१७३ गावांना पुराचा फटका
बदायूं, बहराइच,बलिया, बाराबंकी,बिजनौर, फर्रुखाबाद,गौतम बुद्ध नगर,गोंडा, कासगंज,लखीमपूर खेरी,मुझफ्फरनगर, सीतापूरआणि उन्नाव या १३ जिल्ह्यांतील१७३ गावे पुरामुळे प्रभावितझाली आहेत. पूरस्थितीवरलक्ष ठेवण्यासाठी राज्य मदतआयुक्त कार्यालयाचा नियंत्रणकक्ष जिल्हा प्रशासनाच्यासतत संपर्कात आहे. नागरिकांच्यातक्रारी आणि मदतीसाठी १०७०हेल्पलाइन कार्यरत असून,प्राप्त माहितीवरतातडीने कार्यवाही केली जातआहे.
४,८४५जणांना सुरक्षित स्थळी हलविले
राज्यात १,५८९पूर चौक्या स्थापन करण्यातआल्या आहेत. १,२६३मदत निवारे तयार करण्यातआले आहेत. त्यापैकी४१ निवारे सध्या कार्यरत असून,त्यात १,०४५नागरिक आश्रयाला आहेत.आतापर्यंत ४,८४५जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यातआले आहे. बचावकार्यासाठी४२८ बोटी व मोटरबोटीतसेच १,१०१स्थानिक गोताखोर तैनातकरण्यात आले आहेत. पूरग्रस्तांनाआतापर्यंत १५,२३८अन्नधान्य पाकिटे आणि ३०,३१६जेवणाची पाकिटे वितरितकरण्यात आली आहेत.
एनडीआरएफ,एसडीआरएफ आणि पीएसीसज्ज
आपत्कालीन परिस्थितीचासामना करण्यासाठी राज्यभरएनडीआरएफच्या १६ तुकड्यातैनात करण्यात आल्या आहेत.तसेच एसडीआरएफ आणिपीएसीच्या तुकड्यांना ५२जिल्ह्यांमध्ये सज्जठेवण्यात आले आहे.
१४० कोटींहून अधिकएसएमएस अलर्ट
हवामान विभागाच्याइशाऱ्यांची माहिती नागरिकांपर्यंतपोहोचविण्यासाठी १ ते १८ऑगस्ट २०२६ या कालावधीत१४०.५२कोटींहून अधिक एसएमएस अलर्टपाठविण्यात आले आहेत. सोशलमीडियाच्या माध्यमातूनहीपूरस्थिती आणि आपत्तीच्याकाळात घ्यावयाच्या खबरदारीबाबतनागरिकांना सातत्याने माहितीदिली जात आहे. प्रशासनानेनागरिकांना सतर्क राहण्याचेआवाहन केले आहे. पूरस्थितीवरनियंत्रण ठेवण्यासाठी मदतआणि बचाव यंत्रणा पूर्ण क्षमतेनेकार्यरत आहेत.


