तेजपालला जन्मठेप सुनवावी यासाठी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरण; उच्च न्यायालयाने सुनावलेल्या १० वर्षांच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
तेजपालला जन्मठेप सुनवावी यासाठी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

पणजी : महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेले ज्येष्ठ पत्रकार तरुण तेजपाल यांच्या शिक्षेत वाढ करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने तेजपाल यांना सुनावलेली १० वर्षांची शिक्षा अपुरी असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी तेजपाल यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या मागणीवर सुनावणीदरम्यान काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा