म्हापसा: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात होणार्या ड्रग्ज तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक महिलेकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.
हा ड्रग्ज तस्करीचा प्रकार मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आला. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील (फ्रिक्सींग पॉईंट) आयआरबी पोलिसांना तपासणी वेळी संशयित जीएचआरडीच्या सुरक्षारक्षक कर्मचार्याकडे हा गांजा सापडला.
चहाच्या थर्मासमधून कारागृहात हा मादक पदार्थ नेण्याचा प्रयत्न संशयित महिला कर्मचार्याकडून केला जात होता. मात्र तपासणीवेळी या ड्रग्ज तस्करीचा पदार्फाश झाला. दरम्यान, कारागृह प्रशासनाने दुपारी उशिरा कोलवाळ पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.


