उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत ११ नवीन वाहने

महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी दाखवला हिरवा झेंडा


4 hours ago
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत ११ नवीन वाहने

नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवताना महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात. सोबत जिल्हाधिकारी अंकित यादव व इतर.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
पणजी : महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी सोमवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नव्याने खरेदी केलेल्या ११ वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल केली. या वाहनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत आणि कामकाजात गतिशीलता येण्यास मदत होईल.
महसूलमंत्री मॉन्सेरात म्हणाले, सरकारी सेवा प्रभावी होण्यासाठी कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे होणे महत्त्वाचे आहे. नव्याने खरेदी केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास आणि कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यास उपयोगी ठरतील.
याप्रसंगी महसूल सचिव संदीप जॅकीस, जिल्हाधिकारी अंकित यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.