‘वंदे मातरम्’बद्दल काँग्रेसने माफी मागावी : भाजप

‘वंदे मातरम्’वरून भाजप- काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20 mins ago
‘वंदे मातरम्’बद्दल काँग्रेसने माफी मागावी : भाजप

पणजी :  ब्रिटीश राजवटीत भारतीयांवर बरेच अत्याचार झाले. ‘वंदे मातरम्’ची घोषणा देत भारतीयांनी अत्याचारांचा प्रतिकार केला. ‘वंदे मातरम्’ची घोषणा काँग्रेसला आवडत नाही. ‘वंदे मातरम्’ला केलेल्या विरोधाबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यानंतर पक्षानेही वंदे मातरम् वरून काँग्रेसवर टीका केली आहे.

‘वंदे मातरम्’बद्दल काँग्रेसला आदर नाही,  अशा स्वरूपाची टीका मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी काँग्रेस पक्षावर केली होती. ‘वंदे मातरम्’बद्दल काँग्रेसला आदर नाही तसेच काँग्रेसकडून अपमान झाला आहे, असा अपप्रचार भाजपने चालविला आहे. इतिहास हा इतिहास असतो. तो बदलता येत नाही.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘वंदे मातरम्’चे गायन झालेले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातही ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते, असे सांगत काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचा आरोप फेटाळला होता. यानंतर पुन्हा भाजपने काँग्रेसकडे माफीची मागणी केली आहे. 

यामुळे ‘वंदे मातरम्’वरून भाजप - काँग्रेसमध्ये वाद सुरूच आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सोनिया गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची वर्तणूक सर्वांनी पाहिलेली आहे. मी काही वेगळे सांगायची गरज नाही, असे यावर बोलताना आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा