जानेवारी-जुलैमध्ये गोव्यात ६१.३८ लाख पर्यटक; पर्यटनात ०.०८ टक्के वाढ

जुलैमध्ये ६.९४ लाख पर्यटकांची नोंद; मौसमी पर्यटनाला वाढता प्रतिसाद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
जानेवारी-जुलैमध्ये गोव्यात ६१.३८ लाख पर्यटक; पर्यटनात ०.०८ टक्के वाढ

पणजी :गोव्यात यंदाच्याजानेवारी ते जुलै या सातमहिन्यांच्या कालावधीत तब्बल६१.३८ लाखपर्यटकांनी भेट दिली आहे.गेल्या वर्षीच्यायाच कालावधीच्या तुलनेतपर्यटकांच्या संख्येत .०८टक्क्यांची वाढ झाली आहे.

राज्य पर्यटन विभागानेजाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,यामध्ये ५९.०२लाख देशांतर्गत, तर.३६ लाखविदेशी पर्यटकांचा समावेशआहे.

जुलै महिन्यातगोव्यात ६.९४लाख पर्यटक

जुलै महिन्यातगोव्यात ६.९४लाख पर्यटक दाखल झाले.गेल्या वर्षीच्याजुलैच्या तुलनेत यंदा पर्यटकसंख्येत .२७टक्क्यांची वाढ झाली आहे.पावसाळा हा पारंपरिकदृष्ट्यापर्यटनासाठी कमी गर्दीचा काळमानला जात असतानाही जुलैमध्येपर्यटकांची संख्या वाढल्यानेमौसमी पर्यटनाला चांगलाप्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टझाले आहे.

पर्यटन संचालक केदारनाईक यांनी सांगितले की,राज्य सरकारकडूनपावसाळी पर्यटनाला प्रोत्साहनदेण्यासाठी विशेष प्रयत्नकेले जात आहेत. गोव्याच्याहिंटरलँड, संस्कृती,वेलनेस,खाद्यसंस्कृती,निसर्ग आणि साहसीपर्यटनाचा अनुभव घेण्यासाठीपर्यटकांना आकर्षित केले जातआहे.

गोव्याचा आंतरराष्ट्रीयपर्यटन बाजारपेठेतील विस्तारवाढविण्यासाठीही प्रयत्नसुरू आहेत. नव्याआणि पारंपरिक पर्यटन बाजारपेठांमध्येसंपर्क वाढविण्यासोबतच हवाईवाहतूक संपर्क मजबूत करणेआणि पर्यटकांसाठी विशेष पर्यटनउत्पादने विकसित करण्यावरभर दिला जात आहे.

पर्यटनमंत्री रोहनखंवटे यांनी देशांतर्गतपर्यटकांच्या संख्येतील वाढउत्साहवर्धक असल्याचे सांगितले.केवळ पर्यटकांचीसंख्या वाढविण्याऐवजी विविधपर्यटन अनुभव आणि बाजारपेठांचाविस्तार करण्यावर सरकारचाभर असल्याचे त्यांनी स्पष्टकेले.

गोव्याला वर्षभरपर्यटक आकर्षित करता यावेतआणि राज्यातील विविध पर्यटनअनुभवांसाठी योग्य पर्यटकवर्गनिर्माण व्हावा, हेसरकारचे उद्दिष्ट असल्याचेखंवटे यांनी सांगितले.


हेही वाचा
सर्व पहा