आल्तीन म्हापशात जलवाहिनी फुटली

पाणीपुरवठा खंडित; रस्त्याला तळ्याचे स्वरूप


4 hours ago
आल्तीन म्हापशात जलवाहिनी फुटली

जलवाहिनी फुटून रस्त्यावरून वाहणारे पाणी.
गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : आल्तीन, म्हापसा येथील जुनी १५० मिली मीटर (एमएम) व्यासाची जलवाहिनी सोमवारी फुटली. परिणामी या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला असून मंगळवारी सकाळी पेयजल पुरवठा खात्याकडून ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. कोर्ट जंक्शन ते पेडेकडे जाणाऱ्या एकेरी मार्गाच्या बाजूला ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी बरीच जुनी असून या वाहिनीमार्फत आल्तीन व आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्यामुळे वरील भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच पेयजल पुरवठा म्हापसा विभागातर्फे जलवाहिनीचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र तोपर्यंत हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. मंगळवारी सकाळी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.                     

हेही वाचा
सर्व पहा