पणजी : चर्चशी संबंधित संस्था कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अँड पीस (सीएसजेपी (CSJP)) आणि कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवा (CAG) यांनी केंद्र सरकारच्या ‘फॉरेन कॉंट्रयुब्युशन कायदा’ (एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act) ) विधेयकाला विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
एफसीआरए विधेयकाबाबत आपल्या आक्षेपांची माहिती देताना संस्थांनी काँग्रेसने या विधेयकाला विरोध कायम ठेवावा, अशी मागणी केली. विधेयकातील तरतुदींविरोधात आपली भूमिका मांडत त्यावर सरकारकडून पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही संस्थांनी निवेदनातून नमूद केले. दरम्यान, एफसीआरए विधेयकाविरोधात सुरू असलेला आवाज यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन संस्थांनी कॉंग्रेस पक्षाला केले आहे.


