पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लब अग्नितांडव प्रकरणात क्लबचे मालक लुथरा बंधूंसह अजय गुप्ता यांना म्हापसा न्यायालयाने मंजूर केलेला जामीन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना मोठा धक्का बसला आहे.
६ डिसेंबर २०२५ रोजी ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींना म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या जामिनाला आव्हान देण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन रद्द करण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले असून, लुथरा बंधूंसह अन्य आरोपींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


