म्हापसा : मयडे येथील पुलाजवळ हिट-अँड-रन अपघातात एका कारने ठोकर दिल्याने आंतोनिओ क्वाव्रोस (३४, रा. आताफोंड, मयडे) हा पादचारी युवक ठार झाला. सकाळी ६च्या सुमारास हा अपघात घडला. कारगाडीने १० मीटरवर मयताला फरफटत नेले. नंतर डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात मयडे पुलाजवळ घडला. मयत हा घराजवळील एका आस्थापनात सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत नाईक व हवालदार केशव नाईक यांनी पंचनामा केला. म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police) पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला आहे. पोलीस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.


