स्पर्धेत भजन सादर करताना प्रथम क्रमांकप्राप्त श्री शिव समर्थ सांस्कृतिक मंडळाचे पथक.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
पणजी : कला अकादमीतर्फे आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेत महिला कलाकारांच्या गटात वास्को येथील श्री शिव समर्थ सांस्कृतिक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना ३५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेत श्री राम सेवा संघ महिला भजनी मंडळ, मयडे-बार्देश यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ३० हजार रुपयांचे, तर श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, कारापूर-डिचोली यांनी तृतीय क्रमांक मिळवत २५ हजार रुपयांचे पटकावले. शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ, तुये-पेडणे यांना चौथे पारितोषिक म्हणून २० हजार रुपये देण्यात आले. उत्तेजनार्थ प्रत्येकी १० हजार रुपयांची दोन पारितोषिके देण्यात आली. यामध्ये मेगा संगीत केंद्र, मैक, लोलये, पैंगीण-काणकोण, तसेच श्री केळबाय सातेरी महिला भजनी मंडळ, कुर्टी-फोंडा यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट पखवाजसाथीचे प्रथम पारितोषिक राखी जयदेव नाईक (शिवप्रसाद सातेरी, तुये-पेडणे) हिने पटकावले. या विभागातील द्वितीय पारितोषिक देण्यात आले नाही. उत्कृष्ट संवादिनीसाथीचे प्रथम पारितोषिक स्नेहल गोपाळ गावडे (शिवप्रसाद सातेरी, तुये-पेडणे) हिने, तर द्वितीय पारितोषिक श्रेया पागी (मेगा संगीत केंद्र, मैक, लोलये, पैंगीण-काणकोण) हिला मिळाले. परीक्षक म्हणून अरुण चं. गांवकर, संजीव खांडेपारकर आणि विशांत सुर्लकर यांनी काम पाहिले.
दक्षा परब पहिल्या अभंगातील उत्कृष्ट गायिका
वैयक्तिक गटांमध्ये पहिल्या अभंगातील उत्कृष्ट गायिका म्हणून दक्षा सतीश परब (श्री शिव समर्थ, वास्को) हिने प्रथम, तर दिव्या पांडुरंग च्यारी (श्री राम सेवा संघ, मयडे-बार्देश) हिने द्वितीय पारितोषिक मिळविले. दुसऱ्या अभंगातील उत्कृष्ट गायिका म्हणून कोमल सं. चव्हाण (श्री शांतादुर्गा, कारापूर-डिचोली) हिने प्रथम, तर ऋतुजा घनश्याम च्यारी (श्री राम सेवा संघ, मयडे-बार्देश) हिने द्वितीय पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट गवळण गायक म्हणून राज्ञी नितीन फळदेसाई (श्री हनुमान, नॉन-मॉन, वास्को) हिला प्रथम, तर सलोनी प्रमोद च्यारी (श्री शिव समर्थ, वास्को) हिला द्वितीय पारितोषिक मिळाले.


