नाणूस-सत्तरीत अंगावर भिंत कोसळून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
नाणूस-सत्तरीत अंगावर भिंत कोसळून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

सत्तरी : येथील नाणूस येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. शौचालयात असताना वरुन भिंत कोसळल्याने दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नानूस येथील राहत्या घरी दीड वर्षांच्या मुलाला शौचालयात शौचासाठी सोडून त्याची आई घरकाम करत होती. दरम्यान,अचानक भिंत तिच्या अंगावर कोसळली आणि तो  ढिगाऱ्याखाली दबला गेला. भिंत अंगावर पडल्यामुळे मुलाच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कुटुंबीयांनी व उपस्थितांनी तत्काळ धाव घेत त्याला बेशुद्ध अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी गोमेकॉत नेले. येथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले.


बातमी अपडेट होत आहे 

हेही वाचा
सर्व पहा