वेळसाववासियांच्या आंदोलनाला आमदार सरदेसाई, पाटकर यांचा पाठिंबा

रेल्वेने खासगी जमिनीवर टाकलेली माती हटवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20 mins ago
वेळसाववासियांच्या आंदोलनाला आमदार सरदेसाई, पाटकर यांचा पाठिंबा

पणजी  :  वेळसाव येथे रेल्वेने खासगी जमिनीवर टाकलेली माती हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी घेऊन स्थानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार विजय सरदेसाई आणि कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पाठिंबा दिला. या दोघांनीही याठिकाणी जाऊन माती हटवून स्थानिकांच्या घरांकडे जाणारा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली. 

 रेल्वेने  रहिवाशांच्या संमतीशिवाय खासगी मालमत्तेवर कथितरीत्या माती टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी अमित पाटकर यांच्या मशीनने टाकलेली माती हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिकांच्या जमिनीचा आणि त्यांच्या ये-जा करण्याच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे, अशी भूमिका पाटकर आणि सरदेसाई यांनी घेतली. 

स्थानिकांच्या घरांकडे जाणारा पारंपारिक मार्ग तातडीने खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नावर स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा
सर्व पहा