स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘इनफ इज इनफ’चा जागृती कार्यक्रम

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘इनफ इज इनफ’तर्फे सर्व १२ तालुक्यांत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कलम ‘३९-अ’ आणि मांडवी नदीतील कॅसिनोंविरोधात लक्ष वेधण्यासाठी सायंकाळी ‘मशाल रॅली’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती ‘इनफ इज इनफ’चे नेते देविदान आमोणकर यांनी दिली.


10th August, 11:28 pm
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘इनफ इज इनफ’चा जागृती कार्यक्रम

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘इनफ इज इनफ’तर्फे सर्व १२ तालुक्यांत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कलम ‘३९-अ’ आणि मांडवी नदीतील कॅसिनोंविरोधात लक्ष वेधण्यासाठी सायंकाळी ‘मशाल रॅली’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती ‘इनफ इज इनफ’चे नेते देविदान आमोणकर यांनी दिली.
पणजी येथील ‘इनफ इज इनफ’च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला स्वप्नेश शेर्लेकर आणि गोविंद शिरोडकर उपस्थित होते. आमोणकर म्हणाले, १४ ऑगस्ट रोजी १२ तालुक्यांच्या प्रमुख ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी मशाल पेटवून ‘गोवा वाचवा’ हा विचार घेऊन रॅली काढण्यात येईल. कार्यकर्ते बॅनर आणि तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी होतील. नागरिकांशी संवाद साधून संघटनेच्या १० मागण्यांची माहिती त्यांना दिली जाईल.
मांडवी नदीत येऊ घातलेल्या कॅसिनोंविरोधात खटला सुरू असून, त्याची माहिती लोकांना दिली जाईल. ‘कॅसिनोमुक्त मांडवी’ यावर आम्ही काम करत राहू. १४ रोजी सायं. ७.१५ वा. १२ तालुक्यांमध्ये एकाच वेळी कार्यक्रम सुरू होईल. आयोजनासाठी तालुका समित्यांचे प्रमुख नियुक्त केले आहेत. गोवा वाचवण्यासाठी कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमोणकर यांनी केले.

हेही वाचा
सर्व पहा