गोव्यात चोवीस तासांत १.७५ इंच पाऊस

वाळपईमध्ये सर्वाधिक ५.६० इंच पाऊस

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
46 mins ago
गोव्यात चोवीस तासांत १.७५ इंच पाऊस

पणजी : राज्यात मंगळवारी मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत १.७५ इंच पाऊस पडला. यादरम्यान वाळपईमध्ये सर्वाधिक ५.६० इंच पावसाची नोंद झाली. १ जून ते ४ ऑगस्ट दरम्यान सरासरी ५६.१९ इंच पाऊस पडला. यंदा पावसाचे प्रमाण ३१.८ टक्क्यांनी कमी झाले आहे. पुढील दोन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात दि. ७ ते १० ऑगस्ट दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पणजीत कमाल ३१ अंश तर किमान २४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३० अंश व किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहिले. १० ऑगस्ट पर्यंत राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३२ अंश व किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

१ जून ते ४ ऑगस्ट दरम्यान वाळपईमध्ये ७७.१८ इंच, धारबांदोडामध्ये ७५.९८ इंच, सांगेमध्ये ७४.४५ इंच, केपेमध्ये ६८.८८ इंच, काणकोणमध्ये ६४.१०, फोंडामध्ये ६१.४० इंच तर साखळीमध्ये ५८.८९ इंच पावसाची नोंद झाली.

४ ऑगस्ट रोजी साळावली धरण १०८ टक्के, पंचवाडी १०१ टक्के, गवाणे १०० टक्के, आमठाणे धरण ८६ टक्के, चापोली धरण ६५ टक्के, तर अंजुणे धरण ७१ टक्के भरले होते. तर तिळारी धरण ८६ टक्के भरले असून यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा