प्रसिद्ध नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे निधन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
प्रसिद्ध नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे निधन

पणजी : प्रसिद्ध नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे निधन झाले.  ते गेले काही दिवस आजारी होते. दोडामार्ग येथे मुलीच्या घरी होते. मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 

त्यांनी हौशी रंगभुमिसाठी  ५५  मराठी नाटके लिहिली. ते एक चांगले नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक होते. मंगळवारी दोडामार्ग येथे संध्याकाळी ३ च्या सुमारास त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

 त्यांना राज्य सरकारच्या कला व सांस्कृतिक खात्यातर्फे दिला जाणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कला अकादमीचा पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले.  विधीचक्र, दैवखेळ हा असे वेगळा, एक पिंजरा रिकामा, आघात, कडेलोट, फुटला पाझर पाषाणाला, वाहते गंगा त्यागाची अशा सुमारे ५५ नाटकांचे लेखन त्यांनी केले.

हेही वाचा
सर्व पहा