कुक्कुटपालन विकास महामंडळाचे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत अध्यक्ष

अंडी तसेच कोंबड्यांंचे उत्पादन वाढवण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या नव्या महामंंडळाची स्थापना करण्यात आली आहे.


03rd August, 10:57 pm
कुक्कुटपालन विकास महामंडळाचे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत अध्यक्ष


गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात गोवा राज्य कुक्कुटपालन विकास महामंंडळ स्थापन होऊन अध्यक्षपदी मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नियुक्ती झाली आहे. अंडी तसेच कोंबड्यांंचे उत्पादन वाढवण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या नव्या महामंंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
महामंंडळाचे अन्य संंचालक असे अर्थ सचिव, पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे सचिव, खात्याचे संंचालक, खात्याचे उपसंचालक डॉ. राजेश केणी, अ. गो. पोल्ट्री शेतकरी संंघटनेचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक, अ. गो. पोल्ट्री दुकानमालक संघटनेचे अध्यक्ष पिस्को सिक्वेरा, दक्षिण गोवा पोल्ट्री दुकानमालक संंघटनेचे अध्यक्ष तिमोतिओ टेक्सेरा, अनिशा नायक, सांंताक्रूझ. डॉ. राजेश केणी हे महामंंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

हेही वाचा
सर्व पहा