रामनाथ गावडे यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीची फोंडा पोलिसांत तक्रार

सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी


26 mins ago
रामनाथ गावडे यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीची फोंडा पोलिसांत तक्रार

गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा : साईनगर-उसगाव येथील डॉ. रामनाथ पंढरी गावडे (५४, मूळ मंगेशी) यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी हृतिका गावडे यांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
कोलवाळ तुरुंगात साहाय्यक जेलर म्हणून काम करणाऱ्या डॉ. रामनाथ गावडे यांना तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून सतावणूक केली जात होती. त्यांच्या जाचाला कंटाळूनच गावडे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
डॉ. रामनाथ गावडे यांनी आत्महत्या केली होती. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला होता. रविवारी डॉ. गावडे यांच्या पत्नीने फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ७ जुलै रोजी डॉ. रामनाथ गावडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. १५ जुलै रोजी सायं. ६.२५ च्या सुमारास रामनाथ गावडे यांना मोबाईलवर परेश देसाई या व्यक्तीचा मिस कॉल आला होता. डॉ. गावडे यांनी परेश देसाई यांना त्वरित फोन केला होता. त्या दिवसापासून रामनाथ गावडे तणावाखाली होते. गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. अधिकाऱ्यांच्या सतावणुकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून या संदर्भात सखोल चौकशी करावी, अशी मागणी हृतिका गावडे यांनी केली आहे. फोंडा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.                  

हेही वाचा
सर्व पहा