कामाच्या ताणातून साहाय्यक जेलरची आत्महत्या

डॉ. रामनाथ गावडे लेखक, कवी म्हणून साहित्य क्षेत्रातही प्रसिद्ध होते. कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, कार्यालयीन कारणास्तव अर्ज मंजूर करण्यात आला नव्हता. कामाच्या ताणामुळे ते मानसिक दबावाखाली होते, असे बोलले जात आहे.


31st July, 10:35 pm
कामाच्या ताणातून साहाय्यक जेलरची आत्महत्या

गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा : साईनगर-उसगाव येथील डॉ. रामनाथ पंढरी गावडे (५४, मूळ मंगेशी) यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरात आत्महत्या केली. कोलवाळ तुरुंगात साहाय्यक जेलर म्हणून डॉ. रामनाथ गावडे नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी डॉ. गावडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र कुटुंबियांनी तो रोखला होता. लेखक, कवी म्हणून साहित्य क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. रामनाथ गावडे काही वर्षांपासून कोलवाळ कारागृहात साहाय्यक जेलर म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे सध्या कारागृहातील भोजन व्यवस्थेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात यावा, यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली होती. कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, कार्यालयीन कारणास्तव अर्ज मंजूर करण्यात आला नव्हता. कामाच्या ताणामुळे ते मानसिक दबावाखाली होते, असे बोलले जात आहे.
शुक्रवारी दुपारी मंगेशी येथील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय, साहित्यिक, सामाजिक, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा
सर्व पहा