सरकारी नोकरी म्हणजे मनमानी करण्याचा परवाना नव्हे

प्रशासनावरील शिस्तीसाठी अशा कठोर पावलांची गरज : ‘चर्चेची वार्ता’मध्ये वाचकांचा सूर

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
31st July, 11:39 pm
सरकारी नोकरी म्हणजे मनमानी करण्याचा परवाना नव्हे

पणजी : विजेचा शॉक लागून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वीज खात्याच्या ६ अभियंत्यांसह ५ लाईनमन आणि २ हेल्पर्सवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. या कठोर कारवाईतून इतर सरकारी कर्मचारी बोध घेतील का, या विषयावर ‘दै. गोवन वार्ता’ने ‘चर्चेची वार्ता’मधून वाचकांची मते जाणून घेतली. यावर वाचकांनी अत्यंत रोखठोक आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नोंदवल्या.


इतर खात्यांचे काय?
विराज सप्रे


या कारवाईतून नक्कीच इतर कर्मचारी धडा घेतील, कारण कामचुकारपणामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. कर्मचाऱ्यांनी नोकरीत रुजू होताना घेतलेल्या शपथेचे स्मरण ठेवावे. ‘काम हाच ईश्वर’ मानून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्ष राहून सेवा बजावावी. सरकार पगार कामचुकारपणा करण्यासाठी देत नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, अन्यथा अशा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
डॉ. अशोक कृ. प्रियोळकर



चूक करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. सरकारी नोकरी म्हणजे मनमानी करण्याचा परवाना अजिबात नाही. नियम सर्वांसाठी समान असतील, तरच प्रशासनावर जनतेचा विश्वास कायम राहील
नीलेश नाईक


सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारचा कडक वचक असायलाच हवा. असा धाक नसेल, तर अधिकारी व कर्मचारी जनतेशी मुजोरपणाने आणि निष्काळजीपणे वागू लागतात.
नितीन गावडे

हेही वाचा
सर्व पहा