कोने-प्रियोळ येथे कार-स्कुटरची धडक; स्कुटरस्वाराचा मृत्यू

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
02nd August, 11:48 pm
कोने-प्रियोळ येथे कार-स्कुटरची धडक; स्कुटरस्वाराचा मृत्यू

फोंडा : कोने-प्रियोळ येथे रविवारी रात्री कार आणि स्कुटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्कुटर चालक दत्ता गोविंद नाईक (५५, शेणवीवाडा-शिरोडा) यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ फोंडा-म्हार्दोळ मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
प्राप्त माहितीनुसार, म्हार्दोळहून फोंड्याकडे जाणाऱ्या कारची कोने येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटरशी जोरदार धडक झाली. या धडकेत स्कुटरस्वार दत्ता नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दत्ता नाईक हे व्यवसायाने चालक होते. या अपघाताची नोंद म्हार्दोळ पोलिसांनी केली असून, पोलीस निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गावडे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा