फोंडा : केरये- खांडेपार येथे शनिवारी दुपारी कारला मागाहून स्कुटरची धडक बसून झालेल्या अपघातात स्कुटर चालविणारी युवती जखमी झाली. युवतीला खासगी वाहनातून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, फोंडाहून उसगाव येथे धावणाऱ्या कारला मागाहून जाणाऱ्या स्कुटरची जोरात धडक बसली. अपघातात स्कुटर चालविणारी युवती जखमी झाली. यात कारचे व स्कुटरचे मोठे नुकसान झाले. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार प्रमोद गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.


