विदेश दौऱ्यांच्या आयोजनाच्या बहाण्याने प्राध्यापकासह तिघांना ७९.४६ कोटींचा गंडा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 mins ago
विदेश दौऱ्यांच्या आयोजनाच्या बहाण्याने प्राध्यापकासह तिघांना ७९.४६ कोटींचा गंडा

पणजी : विदेश दौऱ्यांचे आयोजन आणि व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने एका प्राध्यापकासह अन्य दोघांना ७९.४६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी करंझाळे येथील जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पर्वरी येथील प्राध्यापक रघुवीर वेर्णेकर यांच्यासह अन्य दोघांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नीतेश चंद्रा आणि जसिंता शाबाँग या दोघांनी विदेश दौऱ्यांचे आयोजन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने २०२३ ते १५ जून २०२६ या कालावधीत तक्रारदाराकडून सुमारे ७९.४६ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी ठरल्या प्रमाणे त्यांचा विदेश दौरा केला नाही. तसेच वरील रक्कम परत करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी वरील संचालकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा