जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई काणकोणमधून निवडणूक लढविणार

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना देणार आव्हान


27th July, 11:51 pm
जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई काणकोणमधून निवडणूक लढविणार

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोवा क्रिकेट संघटनेचे (जीसीए) माजी अध्यक्ष चेतन मंजू देसाई हे काणकोणमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवर मी दावा करणार असून जनसंपर्क सुरू आहे, अशी माहिती चेतन देसाई यांनी दिली. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा कालावधी असला तरी निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मी काँग्रेसचा सदस्य आहे. उमेदवारीबाबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी चर्चा झाली आहे. मी काणकोणचा असल्याने माझा मतदारांशी संपर्क असतो. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण व इतर सामाजिक कार्यात माझा सहभाग असतो. मागच्या वेळी निवडणूक लढविण्यास मी इच्छुक होतो; मात्र माझ्या उमेदवारीचा विचार झाला नाही. आताही मी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे चेतन देसाई म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा