Home >> गुन्हे >> पत्नीचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; २ कोटींची मागणी : पतीवर गुन्हा नोंद

पत्नीचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; २ कोटींची मागणी : पतीवर गुन्हा नोंद

पत्नीला मारहाण, शिवीगाळ; कोलवा पोलिसांचा तपास सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
पत्नीचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; २ कोटींची मागणी : पतीवर गुन्हा नोंद

मडगाव : कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ,  मारहाण करून तिचे सोन्याचे दागिने बळकावणे, तसेच तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित पती शशांक नाईक याच्याविरुद्ध कोलवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 या प्रकरणी आश्विनी एन. व्ही. (वय २५ वर्षे, रा. हसन, कर्नाटक) यांनी कोलवा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित शशांक विनोद नाईक (वय ३१ वर्षे, मूळ रा. कुमठा, कर्नाटक, सध्या रा. गांधी मार्केट, मडगाव) याने नोव्हेंबर २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत वार्का आणि कोलवा येथे पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. वैयक्तिक वादातून संशयित पतीने पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, पत्नीने दिलेले सोन्याचे दागिने परत न करता ते बेकायदेशीरपणे स्वतःकडेच ठेवले.

 दरम्यान, पतीने पीडित महिलेचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिची अडवणूक केली. आणि तिच्याकडून २ कोटी रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित शशांक नाईक याच्याविरोधात क्रूरता, दुखापत पोहोचवणे, गुन्हेगारी 

हेही वाचा
सर्व पहा